गेल्या मार्च महिन्यापासून हैराण केलेल्या कोरोना व्हायरस पासून आता अहमदनगर जिल्ह्याला हळूहळू दिलासा मिळू लागल्याचे चित्र आहे. कारण जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्येंत तब्बल ६६ हजार २९१ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९७ टक्के आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ८० इतकी झाली आहे.
नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३० आणि अँटीजेन चाचणीत ५७ रुग्ण बाधीत आढळले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले २, कोपरगाव १, नेवासा ३, पारनेर ४, पाथर्डी २ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, कर्जत १, कोपरगाव १, नगर ग्रामीण ३, नेवासा २, पाथर्डी १, राहाता ४, राहुरी २, संगमनेर ४ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ५७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १०, अकोले ३, कर्जत ३, नेवासा २, पाथर्डी १३, राहाता ७, संगमनेर १३, शेवगाव ३, श्रीगोंदा १ आणि श्रीरामपुर २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज कोरोनामुक्त झाल्यामुळे १५८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. या रुग्णामध्ये मनपा ३३, अकोले २, जामखेड ३, कर्जत ४, कोपरगाव ७, नगर ग्रामीण १०, नेवासा १, पारनेर ६, पाथर्डी २२, राहाता १५, राहुरी ६, संगमनेर ३५, शेवगाव ४, श्रीगोंदा २, इतर जिल्हा ८ अशा रुग्णांचा समावेश आहे. |
टिप्पणी पोस्ट करा