संजय राऊत युपीएचे प्रवक्ते कधी झाले ? कोणी केला सवाल वाचा...

          युपीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हावे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. पण त्यासाठी संजय राऊत हे यूपीएचे कधी प्रवक्ते झाले, हे पाहण्याची आवश्यकता आहे,' असा सवालच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांनी केला आहे. ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
          'शरद पवार यांनी युपीएचे अध्यक्ष व्हावे, असे संजय राऊत यांनी म्हटल्याचे मला समजले. तर पी चिदंबरम यांनी सांगितले की पवार साहेब असे बोललेच नसतील. पवार साहेब यांनी सांगितले की बातम्यातून मला हे समजले. यावरून आता संजय राऊत यूपीएचे कधी प्रवक्ते झाले, हे पाहण्याची आवश्यकता आहे,’ असा सवाल करताना प्रा.शिंदे म्हणाले, ‘मुळात शिवसेना यूपीएचा घटक नाही, व ते सांगतात युपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करा. बिहारमध्ये शिवसेना निवडणूक लढली तेथे त्यांना दोन अंकी मते पडली नाहीत. गोव्यामध्ये पोस्टमार्टम करू म्हणाले, तिथे शिवसेना-राष्ट्रवादी चे काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांनी आपले काय चालले आहे ते पाहावे, दुसऱ्याला सांगण्याची आवश्यकता नाही,' असा सल्लाही शिंदे यांनी राऊत यांना दिला.
.........

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने