ईडीच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी लावला भाजपचा झेंडा...

          मुंबई : भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यामुळे या घटनेचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.
           आज शिवसैनिकांनी ईडीच्या कार्यालयावर धडक देत, कार्यालयावर भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅॅनर झळकावुन कारवाईचा निषेध केला. तसेच आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा व केंद्र सरकार यावर गंभीर आरोप केले
           पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले 'मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तुमच्यासारखे अनेक लोक पाहिले आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. मी जर तोंड उघडलं तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना देशाबाहेर जावं लागेल,' त्याचबरोबर, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला. तसेच पुढे ते म्हणाले 'महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहे. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय महाराष्ट्रात सरकार बनवण्यात जे आग्रही होते त्यांना अशा नोटीस पाठवल्या.'
           पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांना ही नोटीस बजावली आहे. हा सर्व प्रकार पाहता राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजपा यांच्यातील कलगीतुरा येत्या काही दिवसात चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने