नगरमधील शाळांकडून पालकांकडे तगादा लावून फी वसूल करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. शाळांकडून पालकांवर फी साठी दबाव टाकला जात आहे. यात संबंधीत शाळांनी सुधारणा न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, अॅड.अनिता दिघे, परेश पुरोहित, विनोद काकडे, धिरज पडोळे, राजू कांबळे, सचिन गुप्ता, संजय आंधळे, किरण सोनी, मकरंद चिंतामणी, रवी दंडी, जय ठाकूर, सचिन शेरकर आदी उपस्थित होते. सध्या कोविडच्या महासंकटामुळे लॉकडाऊनच्या कारणाने सर्व व्यवसाय बंद झाले. सर्व पालक आर्थिक अडचणीला तोंड देत आहे. त्या दृष्टीकोनातून शासनाने देखील फीची सक्ती करु नये, असे आदेश दिले आहेत. परंतु काही शाळांकडून त्याबाबत विचार न करता पालकांकडे सारखी फी मागणी करुन त्यांना अडचण निर्माण केली जात आहे. तरी संबंधित शाळांनी सुधारणा न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने याप्रसंगी नितीन भुतारे यांनी दिली. तर, निवेदन स्वीकारल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळांकडून फी बाबत सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती घेऊन शासनाच्या नियमानुसार कार्यवाही होत आहे की नाही, याबाबत खात्री करु. काही त्रुटी आढळल्यास संबंधित शाळांवर कारवाई करु,असे आश्वासन संघटनेला देण्यात आले. |
टिप्पणी पोस्ट करा