ऑस्ट्रेलियातही सिद्ध मराठी नेतृत्व, राहणेच्या नेतृत्वात भारताची ऑस्ट्रेलियावर मात.

          मेलबर्न: ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ विकेटनी शानदार विजय मिळवला, आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बॉक्सिंग डे कसोटीत या विजयासह भारताने २०२० मधील अखेरी लढत जिंकली आणि २०२० या वर्षाचा शेवट सुखद केला. एडिलेड कसोटीत भारताचा ८ विकेटनी लाजिरवाणा पराभव झाला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने कमाल केली. अजिंक्य रहाणेने फलंदाजीत शतकी खेळी करून टीकाकारांना चोख उत्तर दिले. पण त्याच वेळी आपले नेतृत्व गुण देखील दाखून दिले.
           ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० वर संपुष्टात आल्याने भारताला विजयासाठी ७० धावांची गरज होती. विजयासाठीचे सोपे लक्ष्य पार करताना भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल ५ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला अनुभवी चेतेश्वपर पुजारा देखील आपली चमक दाखउ शकला नाही. पुजाराला कमिन्सने ३ धावांवर बाद केले. त्यानंतर शुभमन गिल (नाबाद ३५) आणि अजिंक्य रहाणे (नाबाद-२७) यांनी विजयासाठीची औपचारिकता पूर्ण केली.
           त्याआधी ऑस्ट्रेलियाने कालच्या ६ बाद १३६ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. ९० षटकानंतर नव्या चेंडूने जसप्रीत बुमराहने भारताला ब्रेक मिळून दिला. त्याने पॅट कमिन्सला २२ धावांवर बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट घेतली. या दोघांनी ५७ धावांची भागिदारी केली. तर पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया दोन धक्के दिले. त्याने प्रथम कॅमरून ग्रीनला व नॅथन लायनला परत जाण्यास भाग पडले. दुसऱ्या सत्राचा खेळ संपण्याआधी अश्विनने जोश हेजलवुडची बोल्ड काढली आणि ऑस्ट्रेलियाचा २०० धावांवर ऑल आउट केला.
           दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. बुमराह, अश्विन, जडेजा यांनी प्रत्येकी २ तर यादवने एक विकेट घेतली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने