ब्युरो टीम :-यावर्षी २०२१ सालचे स्वागत करताना मोठ्या पार्ट्या करण्यास सरकारने बंदी केली होती, तरी पण आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्याचा मोह सेलिब्रिटी जोडप्यांना टाळता आला नाही. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी नवीन वर्षाचे स्वागत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या सोबत केले.
त्यांच्या या पार्टीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट कोहलीने अनुष्का शर्मासोबतचे २०२१ सालचे वेलकम फोटो शेअर केले आहेत, ते हार्दिक पांड्या,नताशा स्टॅन्कोव्हिक आणि काही मित्रांसह डिनर करताना दिसत आहे. या सोबत त्याने लिहले आहे ‘ज्या मित्रांची टेस्ट निगेटिव्ह असते ते एकत्र सकारात्मक वेळ घालवतात. अशा सुरक्षित वातावरणात मित्रांसमवेत वेळ घालवणे यापेक्षा दुसरे काय हवे. हे वर्ष आनंद,आशा आणि आरोग्याने परिपूर्ण असावे. सुरक्षित रहा. 2021 अभिनंदन. हार्दिकनेही ग्रुपची छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आणि लिहिले, 'मित्रांसह पार्टी साजरे करत नवीन वर्षाचे स्वागत करत आहे. प्रत्येकजण सुरक्षित आहे, प्रत्येकाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा'. विराट आणि अनुष्का लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे पालक होणार आहेत. |
टिप्पणी पोस्ट करा