कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 92.63 कोटी मात्रांचा टप्पा केला पार.

गेल्या 24 तासात 43,09,525 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 92.63 (92,63,68,608) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 90,14,182 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
           गेल्या 24 तासांत 24,602 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,32,00,258 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.95% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे. केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 102 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे. गेल्या 24 तासात 22,431 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
           देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,44,198 असून देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.72% आहे. तसेच ही रुग्णसंख्या गेल्या 204 दिवसातील निचांकी आहे.देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 14,31,819 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 57.86 (57,86,57,484) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.
           देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.68% असून गेल्या 104 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.57% असून गेले सलग 38 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 121 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने