| जुनी वाहने भंगारात काढण्याच्या सप्टेंबर 2021 मध्ये भारतीय रेल्वेचा मालवाहतुक आणि उत्पन्न या दोन्हींच्या बाबतीत उच्च प्रमाण गाठण्याचा राखण्याचा कल कायम राहिला आहे. युद्धपातळीवर काम करत भारतीय रेल्वेने सप्टेंबर 2021 महिन्यात केलेल्या मालवाहतुकीच्या आकडेवारीने गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात केलेली मालवाहतूक आणि त्यातून मिळालेले उत्पन्न यांना मागे टाकून प्रगती केली आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये भारतीय रेल्वेने 106 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली जी गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या (102.30 दशलक्ष टन) मालवाहतूकीपेक्षा 3.62% नी जास्त आहे.या काळात भारतीय रेल्वेला मालवाहतुकीतून 10815.73 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आणि हे उत्पन्न गेल्या वर्षी याच काळात झालेल्या (9905.69 कोटी) उत्पन्नाच्या तुलनेत 9.19% जास्त आहे.
भारतीय रेल्वेने सप्टेंबर 2021मधे केलेल्या 106 दशलक्ष टन मालवाहतुकीमध्ये 47.74 दशलक्ष टन कोळसा, 11.24 दशलक्ष टन लोह खनिज, 6.46 दशलक्ष टन अन्नधान्य, 4.19 दशलक्ष टन खते, 3.60 दशलक्ष टन खनिज तेल आणि 6.15 दशलक्ष टन सिमेंट (क्लिंकर व्यतिरिक्त) यांचा समावेश होता. मालवाहतुकीची प्रक्रिया अधिक आकर्षक करण्यासाठी भारतीय रेल्वेतर्फे अनेक सवलती आणि सूट दिली जात आहे याचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
मालवाहतुकीची प्रक्रिया अधिक उत्तम प्रकारे होण्यासाठी केलेल्या सुधारणांचे संस्थात्मकीकारण केले जाईल आणि या सुधारणा आगामी शून्याधारित वेळापत्रकात समाविष्ट केल्या जातील हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय रेल्वेने कोविड -19 च्या आव्हानाला एक संधी समजून त्याचा उपयोग आपल्या सर्वांगीण क्षमता आणि कामगिरी उंचावण्यासाठी केला आहे.
|
टिप्पणी पोस्ट करा