सर्व संसद सदस्य- म्हणजे खासदारांनी नवी दिल्लीत मतदान केले तर सर्व विधीमंडळ सदस्य-म्हणजे आमदारांनी ( यात दिल्ली आणि पुददूचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या मतदारांचाही समावेश) आपापल्या विधीमंडळ परिसरातील मतदान केंद्रात मतदान केले. त्यासोबतच, कोणत्या खासदारांना किंवा आमदारांना काही कारणाने आपल्या नियोजित राज्याबाहेर अथवा दिल्लीबाहेर इतर ठिकाणी मतदान करायचे असल्यास, त्याची व्यवस्थाही निवडणूक आयोगाने केली होती.
मतदानाविषयी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, संसदेच्या एकूण 771 सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यापैकी पांच जागा सध्या रिक्त आहेत. तसेच, राज्य विधानमंडळातील 4025 सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे, त्यापैकी 6 जागा रिक्त असून 2 आमदार अपात्र ठरले आहेत. हे वगळता, 99% मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले. छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, माणिपूर, मिझोराम, पुददूचेरी, सिक्कीम आणि तामीळनाडू या ठिकाणी 100 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.मतमोजणी 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजतापासून सुरू होईल.
टिप्पणी पोस्ट करा