डोंबारी खेळ करणाऱ्या मुलांना आरक्षण द्या; तृप्ती देसाईंची मागणी


कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून दहीहंडीचा उत्सव झाला नव्हता. त्यामुळे सध्या यंदा राज्यभरात दहीहंडी जोरात साजरी होत आहे. शासनानेही यंदा गोविंदांना भरघोस सूट, योजना यांचा लाभ दिलेला आहे. मात्र यावरुन शिंदे सरकारवर आता टीका केली जात आहे.

       गोविंदांना खेळाडूंचा दर्जा देण्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभही मिळणार आहे. त्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सरकारला टोला लगावला. वर्षातून एक दिवस दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्यापेक्षा दररोज साहसी डोंबारी खेळ करणाऱ्या गोरगरीब मुलांना आरक्षण द्या, आशीर्वाद तरी मिळतील.

       गोविंदांना आता खेळाडूंचा दर्जा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. इतर खेळांमधल्या खेळाडूंना ज्या सुविधा मिळतात, त्या आता गोविंदांनाही मिळणार आहे. शिवाय राज्य सरकारच्या खेळाडूंसाठीच्या नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभही घेता येणार आहे. त्यावरुनच आता विविध स्तरांतून सरकारवर टीका होत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने