ब्युरो टीम : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार आणि फिटनेस ठेवणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच काही सवयी वेळीच सुधारणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात आपण दैनंदिन जीवनात काही अशा चुका करीत असतो, ज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे आरोग्य हे चांगले राहावे, तुमचे शरीर हे निरोगी असावे, तर तुम्हाला तुम्ही दैनंदिन जीवनातील काही सवयी बदलाव्या लागतील. चला तर मग त्या सवयी कोणत्या आहेत, ते पाहुयात.
जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे
जेवण झाल्यानंतर अनेकांना आळस येतो. अशावेळी जेवण झाल्यानंतर लगेच झोपायला अनेकांना आवडते. मात्र ही चूक टाळली पाहिजे. कारण ही सवय आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकते.
जेवणानंतर धूम्रपान करणे
धूम्रपान करणे आणि तंबाखू खाणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण यांचे सेवन हे जेवण झाल्यानंतर लगेच केले जाऊ नये. असे केल्याने तंबाखूमध्ये असलेले निकोटीनची ऑक्सिजनशी प्रक्रिया होऊन आरोग्याविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
जेवण झाल्यानंतर व्यायाम करणे
व्यायाम करणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. परंतु जेवण झाल्यानंतर लगेच व्यायाम करणे टाळले पाहिजे. कारण असे केल्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित आजार, अस्वस्थता, चिंताग्रस्तपणा आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
बऱ्याचवेळा दैनंदिन जीवनात होणाऱ्या छोटछोट्या सवयींचे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा सवयी वेळीच बदलण्याची गरज आहे.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा