ब्युरो टीम: राज्यात महाविकासा आघाडी म्हणून
कॉंग्रेस शिवसेनेसोबत भाजपच्या विरोधात राळ उठवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस
पक्षाने पुन्हा एकदा भाजपच्या वळचणीला जाणे पसंत केले आहे. परंतु नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजप आघाडीचं सरकार आले
आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीपीपी सर्वात मोठे पक्ष ठरले आहेत. या राज्यात
सवत मोठा विरोधी पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादीने देखील सत्तेत सहभागी होण्यासाठी हाती
येणारे विरोधीपक्षनेतेपदावर पाणी सोडले आहे.
यामुळे राज्यात
पहिल्यांदा सर्वच पक्ष सत्ताधारी असणार आहेत तर राज्यात पहिल्यांदाच विरोधीपक्ष
नसणार आहे. राष्ट्रवादी आणि जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय
घेतला आहे. कोणत्याही अटीशिवाय हा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात
जिंकलेल्या सर्व पक्षांचं सरकार येणार आहे. हे या निकालाचं वैशिष्ट ठरणार आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा