ब्युरो टीम : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबीयांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यावरून मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आम आदमी पार्टीला एक सल्ला दिलाय.
अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयच्या चौकशीत अडकलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबियांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस दिली आहे. दिल्ली सरकारचे नवे मंत्री आतिशी यांना सिसोदिया यांचा बंगला देण्यात आला आहे. सिसोदिया यांच्या कुटुंबीयांना बंगला रिकामा करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यावरून रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया देत आम आदमी पार्टीला एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे.
रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय
https://twitter.com/RRPSpeaks/status/1636948981271138304?t=VPIHr8WA79cPn3uZkSZ0AA&s=19
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा