ब्युरो टीम: राष्ट्रवादी
कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा
दिला आहे. या राजीनाम्यामागे शरद पवार यांच्या एनसीपी पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार
होण्याचा निर्णय असल्याचं कारण सांगितलं जात आहे.
दरम्यान पवारांनी
कार्यकर्त्यांना, नेत्यांना
विश्वासात न घेतल्याने हा राजीनामा जितेंद्र आव्हाडांनी दिल्याचं सांगितलं जात
आहे. मात्र काल अजित पवारांनी मात्र याबाबत कार्यकर्त्यांची समजूत काढताना कोणीही
राजीनामे देऊ नयेत ते स्वीकारले जाणार नसल्याचं सांगितलं आहे. तरीही आव्हाडांनी शरद पवारांच्या प्रेमाखातर पद सोडले आहे.
टिप्पणी पोस्ट करा