ब्युरो टीम : शहरातील एकामागे एक सुरु असणारी हत्याकांडं, खुनी हल्ले, मारामाऱ्या, बेकायदेशीररित्या ताबे मारण्याचे प्रकार या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी, आ.बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पनेतून "डरो मत" अभियानाची घोषणा 'शिवनेरी' पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. २४ तास ३६५ दिवस नगरकरांसाठी काळे यांचा ८६९८७५७०६३ हा वैयक्तिक मोबाईल क्रमांक 'डरो मत' अभियानाचा हेल्पलाईन क्रमांक म्हणून जाहीर करण्यात आला असून अन्यायग्रस्त, पीडितांना तसेच परिसरातील नागरी समस्यांसाठी मदतीकरीता थेट संपर्क साधण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.
अभियाना विषयी माहिती देताना किरण काळे म्हणाले की, 'दहशती विरोधात व विकासासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दहशतीच्या वातावरणामुळे त्यांचे खचलेले मनोबल उंचविण्यासाठी धीर देणार आहेत. त्यांना भेडसावणारे नागरी प्रश्न जाणून घेत त्याच्या सोडवणुकीसाठी मनपा, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहेत. मी स्वतः या अभियानाच्या माध्यमातून व्यापारी, उद्योजक, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, वकील तसेच हिंदू, मुस्लिमांसह सर्व धर्मीय बांधवांशी, युवा वर्गाशी संवाद साधत दहशतमुक्त विकसित नगरसाठी लोकसहभागातून नगरकरांचे जनआंदोलन उभे करण्यासाठी संवाद साधणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा