chhagn bhujbal: लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु – मंत्री छगन भुजबळ



ब्युरो टीम:  लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्याशी सकारत्मक चर्चा झाली असून महामंडळ स्थापनेबाबत पाठपुरावा सुरु असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी लोणारी समाजाच्या शिष्टमंडळाला दिली.

लोणारी समाज नाशिक विभाग तसेच लोणारी उत्कर्ष मंडळाच्या सदस्यांनी आज नाशिक येथील कार्यालयात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच या प्रसंगी संघटनेच्या वतीने ना.छगन भुजबळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष भोलानाथ लोणारी, देविदास झगडे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, शिवाजीराव लोणारी,दिनकर इंगळे, आशिक खांडेकर, प्रसाद कानडे, डॉ.प्रवीण बुल्हे, उमेश वादगे, निशान बुल्हे, विजय इंगळे, डॉ.सतीश कुऱ्हे, कैलास सत्सारकर, सुभाष कुऱ्हे, हरिभाऊ कुऱ्हे, संजय कुऱ्हे, राहुल कानडे, बाळू बुल्हे, संदीप धोक्रट, किरण धोक्रट, नाना उंडे, राजू कानडे, शिवाजी सत्सारकर, आण्णा बुल्हे, गोपीनाथ कुऱ्हे, धनंजय धोक्रट, रवींद्र खांडेकर, रामनाथ कुऱ्हे, द्वारकानाथ इंगळे, गोपी कुऱ्हे, अशोक कुऱ्हे, रुपचंद लोणारी, गंगा लोणारी, संजय लोणारी, गोरव गोडसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ना.छगन भुजबळ म्हणाले की, लोणारी समजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. महामंडळ निर्माण करण्याची लोणारी समाजाची मागणी शासनाने मान्य केली असून महामंडळ स्थापन करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी आपला सातत्याने पाठपुरवठा सुरु असून लवकरच हे महामंडळ सुरु होईल. लोणारी समाजाने एकसंघ राहून संघटनात्मक काम करावे असे आवाहन त्यांनी लोणारी समाजाच्या बांधवाना केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने