ब्युरो टीम: गुलकंदचे नियमित सेवन हे मेंदूसाठी खूपच फायदेशीर समजलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, गुलकंद खाणे हे केवळ मेंदूसाठीच नाही, तर शरीराच्या इतर भागांसाठी सुद्धा खूप फायदेशीर असेच आहे. चला तर, गुलकंद खाण्याचे नेमके आरोग्यासाठी काय फायदे आहेत, ते आपण जाणून घेयु.
शरीराला थंड करण्याचे काम करणारा गुलकंद हा गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवला जातो. गुलकंद बनवताना त्यामध्ये साखरेचा सुद्धा वापर केला जातो. गुलकंदामुळे शरीराला शर्करा मिळाल्यानं ऊर्जा मिळते.
हृदयासाठी फायदेशीर
गुलकंद हा शक्तिवर्धक असल्यानं तो तुम्हाला निरोगी आणि कार्यक्षम ठेवतो. त्यामध्ये मॅग्नेशिअल आढळते. जे खाल्यानं हृदय निरोगी राहते.
तोंड येण्याची समस्येपासून सुटका
तोंडात फोड येणं म्हणजेच तोंड येण्याची समस्या ही तशी सामान्य आहे. पण या सामान्य समस्येमुळे देखील अनेकदा खूप त्रास सहन करावा लागतो. मात्र, गुलकंदमध्ये व्हिटॅमिन बी चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचे सेवन केल्यास तोंडातील अल्सर दूर होण्यास म्हणजेच तोंड येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
त्वचेसाठी उपयुक्त
शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर काढण्यासाठी गुलकंद उपयोगी ठरतो. त्वचेला येणारी खाज, फोड, सुरकुत्या आणि पुरळांवरही गुलकंद गुणकारी आहे. वृद्धत्वाची गती मंद करून तारुण्य राखण्याचे गुण गुलकंदात नैसर्गिकरीत्या आहेत. गुलकंद खाल्यानं चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत होते.
डोळे निरोगी राहण्यास मदत
गुलकंदचे सेवन केल्यामुळे डोळे निरोगी राहतात. त्याचसोबत डोळ्यातील सूज आणि लालसरपणाची समस्याही दूर होते. त्यामुळे नियमित गुलकंदचे सेवन करणे हे डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे.
स्मरणशक्ती वाढते
गुलकंद खाल्यानं तुमची स्मरणशक्ती चांगली राहते. गुलकंदचे नियमित सेवन हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच जर तुम्ही नियमित गुलकंद खात असाल, तर ते तुमच्या मेंदूसाठी खूप चांगले आहे. गुलकंदच्या नियमित सेवनामुळे मानसिक ताणतणाव दूर होतो.
पोटासाठी फायदेशीर
गुलकंद खाणे हे पोटाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. पोटाला थंडावा देण्यासाठी गुलकंदचे सेवन हे उपयुक्त ठरते. यामुळे अॅसिडीटी आणि पोट्यातील गॅसची समस्या दूर होते. शरीरातील चयापचय प्रक्रिया उत्तम होते. गुलकंदचे सेवन पोटासाठी खूप फायदेशीर आहे. हे खाल्यानं बद्धकोष्ठतेची समस्या सुद्धा दूर होते.
टिप्पणी पोस्ट करा