bollywood; चार चित्रपट, दोन कोटी प्रेक्षक अन् 390 कोटींची कमाई! सिनेसृष्टीची रेकॉर्डब्रेक कामगिरी

 

ब्युरो टीम: मनोरंजनसृष्टीसाठी 12 ते 15 ऑगस्ट हा लॉन्ग वीकेंड एकदम जबरदस्त ठरला आहे. थिएटरमधल्या गर्दीने 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.

सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर', अक्षयकुमारचा 'ओमएमजी 2', सनी देओलचा 'गदर 2' आणि चिरंजीवचा 'भोला शंकर' हे चार चित्रपट प्रदर्शित झाले.

एकाच दिवशी सर्व चित्रपट प्रदर्शित झाले तर नुकसान होण्याचा मोठा अंदाज होता. मात्र तसे न घडता ऐतिहासिक कामगिरी सिनेसृष्टीने केली आहे. चार चित्रपट तीन दिवसांत दोन कोटींहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. त्यामुळे तीन दिवसांत या चित्रपटांनी 390 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि प्रोडय़ुसर्स गिल्ड ऑफ इंडियाने अधिकृत निवेदन देत यासंदर्भात माहिती दिली आहे.

'गदर 2' ने पहिल्या तीन दिवसांत 135 कोटींहून अधिक कमाई केली. 'ओमएमजी 2' ने 43 कोटी, 'जेलर'ने 146 कोटी रुपये आणि 'भोला शंकर'ने 26 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

- 13 ऑगस्ट रोजी आतापर्यंतची एका दिवसांतील सगळय़ात जास्त प्रेक्षकांची नोंद झाल्याचा पीव्हीआर आयनॉक्सचा दावा आहे. या एका दिवशी पीव्हीआर आयनॉक्सच्या देशभरातील सर्व सिनेमागृहात मिळून जवळपास 13 लाख प्रेक्षकांची नोंद झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने