Independence Day: गर्व से कहो हम भारतीय हैं; व्याख्याते महेंद्र मिसाळांचा उत्तम लेख

 

                  भारताची भुमी ही त्यागाची, शौर्याची, बलिदानाची भुमी म्हणुन ओळखली जाते. 

अनेक वर्ष भारतीय समाज हा पारतंत्र्यात जगत होता. भारताला या पारतंत्र्यामधुन मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतीकारकानी आपले रक्त सांडवले. बलाढ्य इंग्रजा विरोधात भारतीय लोकांनी लढा दिला. पोरांपासून थोरांपर्यंत सर्व जाती धर्मातील पुरूष,महीला या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. अहिंसा, मोर्च, सत्याग्रह, उपोषण, निर्देशने, आंदोलने, तर वेळप्रसंगी शस्त्रांचा वापर  करत ब्रिटिशांना सळी कि पळो करून सोडले. अखेर ब्रिटिशांनी शस्त्रे टाकुन भारताला पारतंत्र्यामधुन मुक्त केले. इंग्रजाचा युनियन जॅक ध्वज खाली उतरला गेला व भारताचा तिरंगा हा डौलाने उंचच उंच फडकू लागला.


खरं तर ब्रिटिशा विरोधात लढणे हे सोपे नव्हते कारण ब्रिटिशांकडे सत्ता, शस्रे, पैसा, सैनिक सर्व काही होते. याउलट भारतीय लोकांकडे मातृभूमीसाठी प्रेम व बलिदान करण्याची त्यागी वृत्ती होती.  मातृभुमीसाठी प्राणत्याग करणे हि त्या काळी अभिमानाची गोष्ट होती. वंदे मातरम, जयहिंद, इन्कलाब जिंदाबाद या घोषणा भारतीय लोकांच्या रक्तामधे लढण्याची प्रेरणा निर्माण करत असे. "तुम मुझे खून दो मै तुम्हें आजादी दूंगा", "करा किंवा मरा"अशा घोषणाने तरुणाईला साद घातली गेली. इंग्रजाना "छोडो भारत" चळवळी द्वारे भारत सोडण्यास भाग पाडले. अनेकांनी मातृभूमीसाठी तुरुंगवास भोगला तर काही क्रांतीकारकांनी अंगावर गोळ्या घेतल्या. इथल्या मातीला क्रांतिकारकांचा, समाजसुधारकांच्या बलिदानाचा, त्यागाचा इतिहास लाभलेला आहे. भारत देशात विवीध जात, धर्म,प्रांताचे लोकं राहतात. विविधतेत एकता भारतात दिसून येते. सर्व लोकं आनंदाने एकमेकांच्या सण, उत्सवात सहभागी होतात. "हम सब एक है" हिच भावना सर्वांच्या मनात रुजलेली आहे. आज आम्हाला स्वातंत्र मिळुन कित्येक वर्ष झाले आहे. आज पुन्हा एकदा भारताची ओळख " सोन्याचा धुर" निघणारा देश म्हणून होऊ पाहत आहे. भारत हा महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. नवीन तंत्रज्ञानाने देश विकसित होत आहे. आज आम्ही स्वातंत्र्यदिन उत्साहात  साजरा करत आहोत. आपण सर्वानीच क्रांतीकारकांचे बलिदान स्मरुण मातृभूमि साठी कायमंच त्याग करण्यासाठी तत्पर राहूया व भारतमातेचा तिरंगा जो शौर्याचा, त्यागाचा, बलिदानाचा, समतेचा व बंधुतेचा आहे तो कायमंच डौलाने फडकत ठेवुया. असा निर्धार स्वातंत्र्य दिनी करूया.  

लेखक- महेंद्र मिसाळ ( व्याख्याते व लेखक)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने