ब्युरो टीम : इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाची बॅटिंग फ्लॉप ठरली. 231 धावांचा पाठलाग करण जमलं नाही. पराभवानंतर शुभमन गिल रडारवर आहे. कारण तो दोन्ही इनिंगमध्ये अपयशी ठरला. दुसऱ्या कसोटीतून गिलला वगळण्याची मागणी होत आहे. पण गिलच नशीब चांगलं आहे. अशा खराब प्रदर्शनानंतरही शुभमन गिलला पुढच्या सामन्यात संधी मिळण निश्चित आहे.
हैदराबाद कसोटीतील पहिल्या दोन दिवसांचा खेळ पाहिल्यानंतर टीम इंडियाचा पराभव होईल, अस कदाचितच कोणाला वाटल असेल. टीम इंडियाला पहिली बॅटिंग करताना 190 धावांची आघाडी मिळाली होती. मात्र, तरीही टीम इंडियाचा पराभव झाला. टीमचे स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल रडारवर आहेत. गिल कसोटीत मागच्या एक वर्षापासून सतत अपयशी ठरतोय.
मागच्या 11 इनिंगमध्ये गिलच्या सर्वाधिक धावा किती?
इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये शुभमन गिलने 23 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये शुन्यावर आऊट झाला. गिल मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अहमदाबाद कसोटीत 128 धावांची इनिंग खेळला होता. पण त्यानंतर त्याची फलंदाजी अपयशी ठरली. मार्च 2023 मधील त्या इनिंगनंतर गिलने 11 इनिंगमध्ये फक्त 17 च्या सरासरीने 173 धावा केल्या आहेत. त्याने एकही अर्धशतक झळकवलेलं नाहीय. 36 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.
इच्छा असून पण गिलला का बाहेर बसवू शकत नाही?
हा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर शुभमन गिलला प्लेइंग 11 बाहेर करण्याची मागणी योग्य वाटते. मात्र, तरीही 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच खेळण निश्चित आहे. गिलच नशीब खूप चांगलं आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड इच्छा असूनही शुभमन गिलला बाहेर बसवू शकत नाही, याच कारण आहे केएल राहुल.
तिघांपैकी एकाला संधी मिळणार हे निश्चित
हैदराबाद कसोटीत केएल राहुल चौथ्या नंबरवर फलंदाजीला आलेला. या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली. त्यामुळे केएल राहुल पुढच्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. बीसीसीआयने राहुलच्या जागी सर्फराज खानचा स्क्वाडमध्ये समावेश केला आहे. त्याशिवाय रजत पाटीदार आणि ध्रुव जुरैल सुद्धा टीममध्ये आहेत. आता या तिघांपैकी एकाला संधी मिळणार हे निश्चित आहे. पण शुभमन गिलच खेळण सुद्धा निश्चित आहे.
गिलच्या पथ्यावर पडणारी बाब कुठली?
या तिघांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीय. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे नाहीय. टीम मॅनेजमेंट या तिघांनाही एकाचवेळी संधी देणार नाही. पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर रोहित-द्रविड जोडी जास्त धोका पत्करणार नाही. शुभमन गिल भले फॉर्ममध्ये नसेल, पण त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे, ही बाब त्याच्या पथ्यावर पडणारी आहे. त्यामुळे शुभमन गिल दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसेल.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा