ब्युरो टीम: जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्कराने मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. सुरक्षा दलांनी गुरुवारी राजौरी जिल्ह्यातील एका गावातून चार टिफिन सुधारित स्फोटक उपकरणे (आयईडी), एक वायरलेस सेट, एके दारूगोळा आणि एक टेप रेकॉर्डर जप्त केले. 1 जानेवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्राने पूंछ आणि राजौरीमध्ये सुरक्षेसाठी सीआरपीएफ दल तैनात केले आहे. सुरक्षा दलांकडून केलेली हि कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
राजौरी जिल्ह्यातील हयातपुरा गावात पोलिस आणि सीआरपीएफने सुरू केलेल्या शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. शस्त्रे आणि स्फोटके जप्त केल्यानंतर लष्कराने या परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "एक गुप्त माहितीच्या आधारे, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 237 व्या बटालियनच्या सी कंपनीच्या कर्मचार्यांनी स्थानिक पोलिसांसह हयातपुरा-मांजाकोट भागात आज सकाळी संयुक्त शोध मोहीम सुरू केली, या शोधमोहिमे दरम्यान, सुरक्षा दलांनी एक वायरलेस सेट, एक टेप रेकॉर्डर, एके दारूगोळ्याच्या 23 राउंड आणि चार टिफिन बॉक्स IEDs जप्त केले,"
गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी धनगरी गावात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर, केंद्राने सुरक्षा ग्रीड मजबूत करण्यासाठी राजौरी आणि पूंछ सीआरपीएफ तुकड्यांचा समावेश केला आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये लष्कर आणि राष्ट्रीय रायफल्स (RR) च्या ऑपरेशनल युनिट्सही तैनात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा