Ladki Bahin Yojana : अमोल कोल्हे म्हणतात,'लाडक्या बहिणीसाठी योजना, मग दाजींना…'ब्युरो टीम : महाराष्ट्रातील सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार जुलै महिन्यापासून राज्यातील गरीब महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये मानधन दिलं जाणार आहे. पण या योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे. 

'महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आहे, ही चांगली बाब आहे, मात्र त्याच बहिणीचं जर म्हणणं असेल की आम्हाला बहीण म्हणून काहीतरी देताय, तसंच दाजींना पण काहीतरी द्या, तर सरकार ती मागणी पूर्ण करेल का?' असा प्रश्न उपस्थित करत कोल्हे म्हणाले, 'राज्य सरकारने दाजींच्या शेतमालाला भाव द्यावा, दुधाला भाव द्यावा, तुमचे दाजी दूध डेअरीत दूध घालतात त्या दुधाला ४० रुपये प्रति लीटर भाव द्या, आमच्या पोरांना शिक्षणात सवलत द्या, शैक्षणिक वस्तू खरेदीत सवलत द्या, आरोग्य विभागात ताईसह दाजींना सवलत द्या,' अशी मागणीही कोल्हे यांनी केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने