ब्युरो टीम : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेतून धक्कादाक बातमी समोर आली आहे. चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याकडून अत्याचार झाले. या घटनेवर काँग्रेसचे खासदार आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
बदलापूर येथे झालेल्या घटनेवर राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट लिहली आहे. ते म्हणतात, ‘पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता महाराष्ट्रात मुलींवर भयानक अत्याचार होत आहे. या घटना गंभीर असून विचार करण्यास भाग पाडतात की एक समाज म्हणून आपण कोठे जात आहोत? बदालपूर येथील दोन लहान मुलींवर झालेल्या घटनेवर तोपर्यंत कारवाई केली गेली नाही जोपर्यंत जनता न्यायासाठी रस्त्यावर उतरली नाही. आता एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागले का? अखेर पीडित व्यक्तींना पोलीस ठाण्यापर्यंत जाणे देखील अवघड झाले आहे का?’असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.
पश्चिम बंगाल, यूपी, बिहार के बाद महाराष्ट्र में भी बेटियों के खिलाफ शर्मनाक अपराध सोचने पर मजबूर करते हैं कि हम एक समाज के तौर पर कहां जा रहे हैं?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 21, 2024
बदलापुर में दो मासूमों के साथ हुए अपराध के बाद उनको इंसाफ दिलाने के लिए पहला कदम तब तक नहीं उठाया गया जब तक जनता ‘न्याय की गुहार’…
पोस्टमध्ये राहुल गांधी पुढे म्हणतात,’न्याय देण्यापेक्षा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न अधिक होतो. याचा सर्वाधिक बळी महिला आणि कमकूवत असलेल्या लोकांचा जातो. FIR दाखल न झाल्याने फक्त पीडित व्यक्ती कमकूवत होत नाही तर गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळते. सर्व सरकार, नागरीक आणि राजकीय पक्षांनी यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे की, आपण महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आपण काय पाऊल उचलू शकतो. न्याय हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि पोलीस किंवा प्रशासनाची मर्जी चालणार नाही,’ असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय.
टिप्पणी पोस्ट करा