CM Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिंदे समोर असतील 'हे' चार पर्याय



ब्युरो टीम : शिवसेनेतील आमदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आग्रही आहेत. पण मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिंदे यांच्यासमोर चार पर्याय असणार आहेत.

उपमुख्यमंत्री होणे

महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय राहायचं असेल तर शिंदे यांच्यापुढे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा पर्याय आहे.  उपमुख्यमंत्री म्हणून जसं देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं तसंच काम एकनाथ शिंदेही करु शकतील. याबरोबरच अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे ठेवली जाऊ शकतात.

केंद्रात मिळू शकते मंत्रिपद

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत तर त्यांच्यापुढे केंद्रातल्या सरकारमध्ये मंत्री होण्याचा पर्याय आहे. रामदास आठवले यांनीही हा पर्याय एकनाथ शिंदे यांना दिला आहे. मध्य प्रदेश पॅटर्न जर भाजपाने वापरला तर शिवराज सिंह चौहान यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनाही केंद्रात मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. केंद्रीय भाजपने देखील हा पर्याय शिंदे यांच्यासमोर ठेवल्याची खात्रीलायक सुत्रांकडून माहिती आहे.

कोणतेही पद न घेणे

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद न मिळाल्यास, ते कोणतेही पद न घेता महायुतीत राहू शकतात. तसेच ते आपल्या पक्षाच्या दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्री पद देऊ शकतात.

महायुतीची साथ सोडणे

एकनाथ शिंदे यांच्यापुढचा शेवटचा पर्याय असेल महायुतीची साथ सोडण्याचा. पण तसं घडलं तर तो राजकीयदृष्ट्या योग्य निर्णय नाही. एकनाथ शिंदेंनी महायुतीची साथ सोडली तरीही महायुतीकडे इतक्या जागा आहेत की सरकार येईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने