ब्युरो टीम : भाजप श्रेष्ठी अमित शाह यांनी महाराष्ट्रातील महायुतीचे तीन शिलेदार देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम फैसला झाल्याची माहिती आहे. भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित झाले असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. परंतु मुख्यमंत्रिपदाचं नाव भाजपचे निरीक्षक मुंबईत येऊन जाहीर करणार आहेत.
दरम्यान, अडीच तास चाललेल्या कालच्या बैठकीत मंत्रिमंडळ खातेवाटपावरही चर्चा झाली आहे.
महाराष्ट्रात महायुतीला एकूण २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी १३२ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. भाजपा १३२ आमदारांसह राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागा जिंकल्या आहेत. तर त्यांच्या शिवसेनेचे ४ पुरस्कृत आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे ६१ आमदारांचं बळ आहे. तर अजित पवार यांच्याकडे ४१ आमदारांचं बळ आहे. असं असलं तरीही मुख्यमंत्री कोण होणार? हा सस्पेन्स कायम होता. अखेर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे असे सूत्रांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा