IFFIWood :इफ्फी 2024 मध्ये अभिनेता विक्रांत मेस्सी भारतीय चित्रपटसृष्टीतला उल्लेखनीय चेहरा पुरस्काराने सन्मानित



ब्युरो टीम :  गोव्यात 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) सांगता सोहळ्यात अभिनेते विक्रांत मेस्सी यांना 'भारतीय चित्रपटसृष्टीतला उल्लेखनीय चेहरा पुरस्काराने' सन्मानित  करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीतील अनन्यसाधारण योगदानाबद्दल विक्रांत मेस्सी यांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व  माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार स्वीकारताना मॅसी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ''माझ्यासाठी हा क्षण खरोखरच खास आहे; हा पुरस्कार मिळेल, याची कल्पनाही मी केली नव्हती. जीवनात चढ-उतार असतात मात्र  '12वी फेल'  या चित्रपटातील माझ्या पात्राप्रमाणे आपण पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी सज्ज असायला हवे,'' असे विक्रांत मेस्सी यांनी सांगितले. 

"मुळात मी कथा सांगणारा आहे. सामान्य लोकांचा आवाज बनू शकतील, अशा संहिता मी निवडतो" असेही त्यांनी सांगितले. 

तुम्ही कुठूनही आला असलात तरी तुम्ही स्वत:वर, तुमच्याकडच्या कथानकांवर, तुमची मुळे जिथे रुजलीत त्यावर विश्वास, ठेऊन जबाबदारीपूर्वक कृती करा. भारतीय चित्रपटसृष्टी हे आपण ज्याचा भाग असायला हवं, असं वाटायला लावणारी सर्वात नेत्रदीपक चित्रपटसृष्टींपैकी एक आहे, अशी भावना विक्रांत मॅसी यांनी यावेळी बोलून दाखवली. 

विक्रांत मेस्सी यांच्या कारकिर्दीय वाटचालीचा प्रवास म्हणजे, स्वप्ने आणि संघर्ष कोणालाही अविश्वसनीय वाटावी अशी उंची कशा रितीने गाठून देऊ शकतात, यावेळी विक्रांत मेस्सी यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीबद्दलही उत्सुकतेने सांगितले. माझ्या अभिनय कौशल्याच्या अनेक पैलू अजुनही सर्वांसमोर येणं अद्याप बाकी आहे, कृपया सगळ्यांनी काही काळ वाट पाहा अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विक्रांत मेस्सी यांची चित्रपट कारकिर्द अतिशय विलक्षण आहे. त्यांच्या या नाटचालीत दिल धडकने दो (2015), अ डेथ इन द गुंज (2016), लिपस्टिक अंडर माय बुरखा (2016), हाफ गर्लफ्रेंड (2017), डॉली किट्टी और वो चमकते सितारे (2019), गिन्नी वेड्स सनी (2020) आणि विज्ञान आधारित कथानकावरचा उल्लेखनीय चित्रपट ठरलेल्या कार्गो (2020) यांसारख्या उल्लेखनीय चित्रपटांचा त्यात समावेश आहे. त्यांनी प्रत्येक चित्रपटात केलेल्या सकस आणि दमदार अभिनयातून स्वतःमधल्या अष्टपैलूत्वाचे आणि कलेप्रती आपल्या समर्पण वृत्तीचे दर्शन घडवले आहे. त्यामुळेच त्यांनी समीक्षक आणि प्रेक्षकांचीही वाहवा मिळवली आहे.

विक्रांत मेस्सी यांच्या अभिनयातील जीवंतपणा आणि प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील अशा त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा, यामुळे प्रेक्षकांशी जोडून घेण्याची मोठी क्षमता आहे. त्यातूनच ते  सामान्य माणसाच्या चित्रपटसृष्टीतील आवाजाचे खरे प्रतिनिधी बनले आहेत. एकीकडे विक्रांत मेस्सी हे अभिनय क्षेत्रात नवनवे आयाम शोधू पाहात आहेत, याच प्रक्रियेतून ते देत असलेलै योगदान, हे भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणारे आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने