विक्रम बनकर, अहिल्यानगर : 'अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीच्या मतदारांचा विश्वास राहिला नाही. त्यांचे सरकार आपल्यासाठी काही करेल, यावरचा विश्वास उडाला होता. दारूसंबंधीचे त्यांचे धोरण लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे त्यांना नाकारले. आता यापुढे आम आदमी पार्टीची सत्ता कधी कोठे येईल का? हे सांगणे कठीण आहे' असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह प्रमुख नेत्यांचाही पराभव झाला आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया देताना नेमका पराभव कशामुळे झाला? हे सांगितले.
राळेगणसिद्धीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे यांनी सांगितले की, 'अरविंद केजरीवाल माझ्यासोबत होते, तेव्हा त्यांची नियत साफ होती. एक चांगला कार्यकर्ता आहे, असे समजून मी सोबत घेतले होते. मात्र पुढे जाऊन त्यांनी पक्ष आणि पार्टी जेव्हा काढली तेव्हापासून मी त्यांची साथ सोडली. राजकारणात गेल्यावर सुरुवातीला चांगली कामे केली मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली. केजरीवाल यांना विचार, चारित्र्य शुद्ध ठेवणे आवश्यक असल्याचे मी अनेकदा सांगत होतो. त्यांनी ऐकले नाही. दारूच्या दुकानांसाठी त्यांनी आणलेले धोरण आणि त्यात झालेले गैरप्रकार दिल्लीच्या मतदारांना आवडले नाहीत. त्यामुळे त्यांचा पराभव झाला,' असं हजारे म्हणाले.
अरविंद केजरीवाल बाबत बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे झाले भावुक!
— मराठी Print (@Marathi_print) February 9, 2025
पहा संपूर्ण #व्हिडीओhttps://t.co/rBtD7tJMO2#ArvindKejriwal #AAP #DelhiElectionResults #BJP #annahajare #Kejriwal #arvind_kejriwal @BJP4Maharashtra #AAPvsBJP #AAPFail #आप #DelhiPolls #Delhi #DelhiElection
अण्णा झाले भावुक!
आम आदमी पार्टीचा जन्म ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकपालसंबंधीच्या आंदोलनातून झाला होता. केजरीवाल हे एकेकाळी हजारे यांचे शिष्य म्हणून ओळखले जात होते. राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर हजारे यांनी त्यांच्याशी संबंध तोडले. पण केजरीवाल यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना अण्णा भावूक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
पहा संपूर्ण व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा