Board Exam : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची समुपदेशनाची सेवा


ब्युरो टीम : आगामी इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी कळविले आहे. 

विद्यार्थी व पालकांना परीक्षेसंदर्भात काही समस्या असल्यास खाली दिलेल्या भ्रमणध्वनीवर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत समुपदेशकांशी संपर्क साधता येईल.

समुपदेशकांची नाव व भ्रमणध्वनी क्रमांक असे 

पुणे- स्नेहा सडविलकर (९०११३०२९९७), पूनम पाटील (८२६३८७६८९६), संध्या फळसणकर (८७६७७५३०६९) 

बारामती- गायत्री वाणी (७३८७४००९७०)

सोलापूर- वृषाली आठवले (९८३४०८४५९३), मीनाक्षी हिरेमठ (८३२९२३००२२), संगीता सपकाळ (९५५२९८२११५).

परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत इयत्ता १० वी साठी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३०४२६२७ व इयत्ता ११ वी साठी  ७०३८७५२९७२ हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध असल्याचेही उकिरडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने