ब्युरो टीम : अहिल्यानगर शहरातील अतिक्रमणांबाबत आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात सोमवारी (१० फेब्रुवारी) रोजी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर सावेडी उपनगरातील पारिजात चौकात असलेल्या तांबटकर मळ्यातील अतिक्रमणे महापालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केली.
पारिजात चौक येथे तांबटकर मळा येथे असलेल्या गाळ्यांवर सोमवारी अखेर महापालिकेने कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केले. यावेळी मोठ्या संख्येने गाळेधारक व जमीन मालक तसेच परिसरातील नागरिक जमा झाले होते.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली महत्त्वाची माहिती
गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकात खासगी जागेत अनाधिकृतपणे गाळे बांधल्याप्रकरणी महानगरपालिकेने इक्राम खान तांबटकर यांच्यासह १६ जणांना सन २०१९ व २०२३ मध्येच नोटिसा बजावल्या होत्या. वारंवार सूचना देऊनही सदरचे अनधिकृत पत्रा गाळे काढून न घेतल्याने महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी कारवाई सुरू केली असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
पहा व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा