Beed : खरीप हंगाम 2025 जिल्हास्तरीय कार्यशाळा प्रशिक्षण वर्ग संपन्न


ब्युरो टीम : खरीप हंगाम 2025ची पूर्वतयारी व नियोजनाकरिता जिल्हा अंतर्गत कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची एकदिवसीय कार्यशाळा बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी बीड येथे संपन्न झाली.

या कार्यशाळेस विभागीय कृषी सहसंचालक पी.आर.  देशमुख छत्रपती संभाजीनगर, अधीक्षक कृषी अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक माधुरी सोनवणे छत्रपती संभाजी नगर, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी बीड, एस. एम. साळवे, नोडल अधिकारी तथा अधिक्षक अभियंता व प्रशासक पल्लवी जगताप,  लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण बीड, डी.व्ही. जाधवर, कृषी उपसंचालक एस एस सय्यद, कृषी विकास अधिकारी बीड तसेच सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी येणाऱ्या आगामी खरीप हंगाम 2025 ची पूर्वतयारी व नियोजना बाबत क्षेत्रीय स्तरावर करावयाच्या विविध मोहिमा यामध्ये माती परिक्षण मोहिम, घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी मोहीम, बीज प्रक्रिया मोहिम, हुमणी किड निमंत्रण मोहीम, खरीप पिकाच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी गावनिहाय प्रशिक्षण मोहीम, कृषी निविष्ठांच्या वाजवी वापराबाबत जनजागृती मोहीम, आपत्कालीन पीक नियोजन कार्यशाळा प्रशिक्षण सत्रे इत्यादी करिता दिलेल्या वीत वेळ वेळापत्रकानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत पी.आर. देशमुख विभागीय कृषी सहसंचालक यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले.

आगामी खरीप हंगामाकरिता खते, बियाणे व आवश्यक निविष्ठा यांचे मान्सून आगमनाच्या पूर्वीच तालुका न्याय पुरवठा नियोजन तसेच त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने आवश्यक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.

सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील कृषी विभागाचे सर्व कृषी सहाय्यक, कृषी प्रर्यवेशक, मंडळ कृषी अधिकारी, कार्यालय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच सर्व तंत्र अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध शेतकरी गटाच्या तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवराच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा  अधिक्षक कृषी अधिकारी एस.एम. साळवे तर आभार प्रदर्शन  कृषी उपसंचालक डी.व्ही. जाधवर यांनी केले.

                                                                  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने