Pune : कोथरूडचे ग्रामदैवत म्हातोबाच्या मूळ ठिकाणी जाणे झाले अधिक सुकर


ब्युरो टीम : कोथरूडचे ग्रामदैवत श्री म्हातोबाचे मूळ ठिकाण असलेल्या एआरआय टेकडीवरील मंदिराकडे जाणे अधिक सुकर झाले आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून सदर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी करण्यात आली असून, त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोथरूडचे ग्रामदैवत श्री म्हातोबा यांचे एआरआय टेकडीवरील मूळ ठाणे असून, मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची अतिशय दुरवस्था झाली होती. सदर पायऱ्या अतिशय जीर्ण आणि भग्न झाल्याने मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागत होती. सदर पायऱ्यांची पुनर्बांधणी करुन; दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची व्यवस्था व्हावी; अशी ग्रामस्थांची सातत्याने मागणी होती.

त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेत; या पायऱ्यांची पुनर्बांधणी केली असून; घडीव दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिर परिसराचे वैभव देखील वाढले असून; दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, 'मंदिर हे सामाजिक ऐक्य आणि संस्कारांचं केंद्र आहे. त्यामुळे तिथे होणाऱ्या एकत्रिकरणातून सामाजिक ऐक्य जपले जाते. राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना; अनेक मार्ग उभारले. पण मी लहानपणापासून ज्या देवस्थानात जायचो; त्या कोल्हापूरमधील तळे माऊली मंदिराकडे जाणारा मार्ग तयार केला.'

ते पुढे म्हणाले की, 'कोथरुड मतदारसंघातील म्हातोबाचे मूळ ठिकाण असलेल्या एआरआय टेकडीवरील मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे हे काम करुन; म्हातोबांच्या चरणी अर्पण करतो. भविष्यात ही या परिसराच्या विकासासाठी एकात्मिक आराखडा तयार करावा; त्यासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देऊ,' अशी ग्वाही यावेळी दिली. दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराबद्दल म्हातोबा सेवक संघाच्या वतीने समाधान व्यक्त केले.

पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने