विक्रम बनकर, अहिल्यानगर : जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त भव्य दिव्यांनी सजवलेला दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तब्बल ३ लाख दिव्यांनी उजळलेल्या या दीपोत्सवाचे आयोजन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.
या दीपोत्सवाचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सभापती राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपोत्सवामुळे अहिल्यादेवींच्या शिल्पसृष्टी परिसरात दिव्यांची भव्य आरास पाहायला मिळाली, ज्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
व्हिडिओ : शिर्डीतील गुन्हेगारीबाबत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठं वक्तव्य
त्रिशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितले. हा दीपोत्सव फक्त दिव्यांचा नव्हे, तर अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा देणारा आहे,'असेही ते म्हणाले.
रोहित पवारांवर गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी चौंडी येथे शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे रोहित पवार यांनी आयोजन केलं होतं. तेव्हा मला त्या कार्यक्रमात सहभागी होऊ दिलं नव्हतं. मला अडवण्यात आलं. पण त्यानंतर दोन महिन्यांतच त्यांच्या सरकारचा अस्त झाला. आज मी त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा करत आहे. या विधानातून गोपीचंद पडळकर यांनी राजकीय सडेतोड भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा