या पोर्टलवर हॉटेल्स, कृषी पर्यटन केंद्र, पर्यटन व्हिला, रिसॉर्ट, कन्वेन्शन सेंटर, वेलनेस सेंटर, इको टुरिझम, स्पेशल टूर्स, गाईड (पर्यटन मार्गदर्शक), टूर व ट्रॅव्हल्स, निवास व न्याहरी, आर्ट ॲण्ड क्राफ्ट शॉप, सोव्हेनियर शॉप, प्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने इत्यादी आपल्या व्यवसायाची नोंदणी नि:शुल्क करू शकतात.
पर्यटकांना या पोर्टलवर सर्व प्रकारच्या पर्यटन व्यवसायाची माहिती व फोटो एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून पर्यटकांना बुकिंगची सुविधा मिळणार आहे. या पोर्टलमुळे पर्यटक व पर्यटन व्यावसायिकांना चांगल्या प्रकारे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ ब्लब मैदान जवळ, नाशिक 422001 या कार्यालयात प्रत्यक्ष अथवा 0253-2995464 या दूरध्वनी क्रमांकवर व 8390731737, 7588950697 या क्रमांकार संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा