ब्युरो टीम: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध विभागांमार्फत देणा-या येत असलेल्या सेवांच्या दर्जाच्या मूल्यमापनाची तपासणी राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक यांचेमार्फत करण्यात येत आहे. यामध्ये अधिनियमातील तरतुदीनुसार विभागाने अधिसूचित केलेल्या सेवा, अधिसूचित असलेल्या सेवांच्या माहितीचे फलक, विहीत नमुन्यातील अर्ज, अर्जदाराना द्यावयाच्या पोहोच पावत्या, अधिसूचित केलेल्या सेवांकरीता दिलेल्या कालमर्यादेचे पालन, विहीत केलेल्या नमुन्यातील नोंदवहया आदी मुदयांबाबत महालेखापालाच्या लेखापरीक्षा धर्तीवर हे सखोल परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक विभागाच्या आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांनी दिली.
राज्यातील जनतेस पारदर्शक पध्दतीने, कार्यक्षमरित्या आणि समयबद्ध सेवा उपलब्ध करण्यासाठी तसेच त्याअनुषंगाने अधिसूचित सेवा पुरविणारे शासनाचे विविध विभाग, सार्वजनिक प्राधिकरणे यांच्यात उत्तरदायीत्व निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 पारित केला असून या कायदयाची दि. 28 एप्रिल 2015 पासून महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अंमलबजावणी करण्यांत येत आहे.
यामध्ये अधिनियमातोल तरतुदीनुसार विभागाने अधिसूचित केलेल्या सेवा, अधिसूचित असलेल्या संर्वाच्या माहितीचे फलक, विहीत नमुन्यातील अर्ज, अर्जदाराना दयावयाच्या पोहोच पावत्या, अधिसूचित केलेल्या सेवांकरीता दिलेल्या कालमर्यादेचे पालन, विहीत केलेल्या नमुन्यातील नोंदवहया आदी मुद्दयांबाबत महालेखापालाच्या लेखापरीक्षण धर्तीवर हे सखोल परिक्षण करण्यात येणार आहे.
दिनांक 20 मे 2025 ते 30 मे, 2025 या कालावधीत राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक कार्यालयाचे पथकाने आदिवासी विकास विभाग या विभागाचे लेखापरीक्षण सुरु केलं आहे. त्यानुसार दिनांक 20 मे, 2025 पासून परीक्षणास सुरुवात झाली आहे. दिनांक 22 मे रोजी राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक विभागाच्या आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांनी आदिवासी विकास विभागास भेट देऊन परीक्षणात आढळून आलेल्या त्रुटींबाबत आयुक्त आदिवासी विकास श्रीमती लीना बनसोड तसेच इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. श्रीमती बनसोड यांनी परीक्षणातील त्रुटींबाबत तात्काळ पूर्तता करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले.
अशाच प्रकारे नजिकच्या काळात नाशिक महानगरपालिका, परिवहन विभाग, भूमिअभिलेख विभाग तसेच इतर कार्यालयाची सखोल तपासणी आयोगाकडून करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा