Sangli : नवजात शिशू चोरी प्रकरणी आरोपी महिलेस अटक

ब्युरो टीम : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथील प्रसूतिपश्चात (pnc) कक्ष क्रमांक 64 येथून दिनांक 3 मे 2025 रोजी दुपारी 12 च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे येथील कविता समाधान अलदार या महिलेचे 3 दिवसांचे पुरुष जातीचे बाळ अज्ञात महिलेने घेऊन गेल्याची घटना घडली होती. दिनांक 5 मे  रोजी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करुन तिच्याकडून चोरी गेलेले बाळ ताब्यात घेऊन त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

बाळ गहाळ झाल्याची बाब कर्तव्यावर उपस्थित परिचारिका यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने महात्मा गांधी चौक, पोलिस स्टेशन, मिरज येथे तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने घटनास्थळी तपासणी करुन संबंधितांचे जाब-जबाब घेऊन तसेच रुग्णालयातील सी.सी.टी.व्ही. फुटेज यांची तपासणी करुन तातडीने पुढील तपास सुरू केला.  पोलिस प्रशासनातर्फे आरोपी महिलेला अटक करुन तिच्याकडून चोरी गेलेले बाळ ताब्यात घेऊन दि. 5 मे रोजी रात्री 9 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज प्रशासनाच्या ताब्यात दिले. रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांनी बाळाची संपूर्ण तपासणी केली असून बाळ सुदृढ अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे. बाळ नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस प्रशासनातर्फे सुरु असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यापुढील कार्यवाही करण्यात येईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने