Ahilyanagar :मार्केटयार्डमध्ये दिंडीचा मुक्काम, महानगरपालिकेकडून साफसफाई


विक्रम बनकर,अहिल्यानगर : येत्या दोन दिवसात अहिल्यानगर शहरातून दिंड्या मार्गस्थ होणार आहेत. त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी व दिंडी मार्गावर महानगरपालिकेकडून पिण्याचे पाणी व शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्केटयार्ड परिसरात दिंडी मुक्कामी राहणार असल्याने या ठिकाणी महानगरपालिकेने संपूर्ण साफसफाई केली असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. 

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून जाणाऱ्या काही पालख्या अहिल्यानगर शहरात मुक्कामाला असतात. शहरातून जाणाऱ्या दिंडी मार्गावर वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले आहे. शहरातील दिंडी मार्गावर पिण्याचे पाणी, पेट्रोल पंपाच्या ठिकाणी पंप चालकांशी संपर्क साधून स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मार्केटयार्ड परिसरात दिंडी मुक्कामी असल्याने या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. त्यासाठी काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १०० मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दिंडी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी प्लॅस्टिक अथवा थर्माकोलचा वापर होणार नाही, या दृष्टीने नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दिंडी मार्गावर कचरा संकलनासाठी कर्मचारी व घंटागाडी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने