Beed : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांकडून कामकाजाचा आढावा


ब्युरो टीम  : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आज बीडच्या जालना रोड येथे होत असलेल्या महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाच्या जागेची पाहणी केली. यासह याठिकाणी महामंडळाच्या कामकाजाचा सविस्तर आढावाही घेतला.मराठवाड्यातील महामंडळाचे सर्व जिल्हा समन्वयक, संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

मराठवाडा विभागातील हे कार्यालय सुसज्ज आणि अद्ययावत असणार आहे. पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा येथे उपलब्ध असतील. या उपविभागीय कार्यालयामुळे मराठवाड्यातील लाभार्थी यांचा वेळ वाचेल. अधिकाधिक लाभार्थी यांना महामंडळाच्या योजनांचा लाभ देण्यासही लाभार्थी व महामंडळ यांना सोयीचे होईल. तालुकास्तरावर देखील महामंडळाच्या योजना पोहोचविण्यासाठी आगामी काळात दौरे करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने