विक्रम बनकर, अहिल्यानगर : श्रीरामपूर मधील दहा हातभट्टी दारू अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापे टाकण्यात आले असून ३ लाख ९७ हजार रुपये किंमतीची ३ हजार २०० लिटर कच्चे रसायन व ३८५ लिटर हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे.
अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, संदीप दरंदले, रमीजराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ व उमाकांत गावडे अशांना श्रीरामपूर तालुक्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सूचना देऊन पथक रवाना केले. या पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील अवैध गावठी हातभट्टी अड्डयांची माहिती काढुन छापे टाकुन कारवाई केली .पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे दहा गुन्हे दाखल करून त्यामध्ये ३ लाख ९७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
पोलीस स्टेशन - गुन्हा नंबर - जप्त मुद्देमाल- किंमत
- श्रीरामपूर शहर 622/2025, 40 लि.हातभट्टी दारू व 350 लि.कच्चे रसायन 43000
- श्रीरामपूर शहर 623/2025, 30 लि.हातभट्टी दारू व 300 लि.कच्चे रसायन 36000
- श्रीरामपूर शहर 624/2025, 40 लि.हातभट्टी दारू व 250 लि.कच्चे रसायन 33000
- श्रीरामपूर शहर 625/2025, 40 लि.हातभट्टी दारू व 300 लि.कच्चे रसायन 38000
- श्रीरामपूर तालुका 341/2025, 50 लि.हातभट्टी दारू व 400 लि.कच्चे रसायन 50000
- श्रीरामपूर तालुका 342/2025, 30 लि.हातभट्टी दारू व 350 लि.कच्चे रसायन 41000
- श्रीरामपूर तालुका 343/2025, 35 लि.हातभट्टी दारू व 300 लि.कच्चे रसायन 37000
- श्रीरामपूर तालुका 344/2025, 30 लि.हातभट्टी दारू व 350 लि.कच्चे रसायन 41000
- श्रीरामपूर तालुका 345/2025, 45 लि.हातभट्टी दारू व 200 लि.कच्चे रसायन 29000
- 10 श्रीरामपूर तालुका 346/2025, 45 लि.हातभट्टी दारू व 400 लि.कच्चे रसायन 49000
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
पहा कारवाईचा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा