Nagpur :चतुर्थ फेरीच्या प्रवेशास 9 जून शेवटची तारीख


ब्युरो टीम : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२५-२६ या वर्षाचे आरटीई २५ टक्के प्रवेशांतर्गत प्रतीक्षाधीन यादीतील चतुर्थ फेरीच्या प्रवेश२९ मेपर्यंत होते . यास मुदतवाढ मिळाली असून चतुर्थ फेरीच्या प्रवेशाची ९ जून ही शेवटची तारीख आहे.

अद्याप ज्या पालकांनी निवड झालेल्या बालकांचे प्रवेशासाठी तालुका पडताळणी समितीकडे संपर्क साधलेला नाही अशा पालकांनी तालुका पडताळणी समितीकडे कागदपत्रासह प्रत्यक्ष संपर्क साधावा व प्रवेशाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने