Nagpur : आणीबाणीत कारावास सोसलेल्या सन्मानधारकांचा २५ जून रोजी होणार गौरव

ब्युरो टीम : पन्नास वर्षांपूर्वी २५ जून १९७५ रोजी या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारा दिवस म्हणून ओळखले जाते. सर्वसामान्यांना केवळ वृत्तपत्रे, रेडिओ या माध्यमातूनच भवतालची माहिती कळायची. २५ जून रोजी आणीबाणी जाहीर झाल्यानंतर पहिला घाला हा वृत्तपत्रांवर बसला. आम्ही सांगू तेच प्रसिद्ध करायचे इथपासून ते नागरिकांच्या भाषण स्वातंत्र्यापर्यंत, विचारविनिमयापर्यंत अघोषित बंदी यातून लादल्या गेली.

नागपूर येथून आणीबाणी विरुद्ध तेव्हा व्यक्तीस्वातंत्र्यासाठी कारावास पत्करला. अनेक जणांनी व्यापक लढा दिला. या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास भोगला अशा आणीबाणी धारकांना शासनातर्फे सन्मानित केले जाणार आहे. बुधवार दिनांक २५ जून रोजी सकाळी ११ वाजता  नियोजन भवन येथे सन्मानित करण्यात येणार आहे. या समारोहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र बहाल केले जाणार आहे.

या समारोहास नागपूर जिल्हयातील सर्व मिसा व डीआयआर अंतर्गत आणिबाणी सन्मानधारक यांना समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने