Ahilyanagar : अमली पदार्थांचे दुष्परिणाम विषयावर बी. एड. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा

ब्युरो टीम :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) संचलित प. पू. डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय, केडगाव देवी रोड, अहिल्यानगर येथे बी. एड. द्वितीय वर्ष (सन 2025-26) च्या विद्यार्थी शिक्षकांसाठी 'अमली पदार्थांचे दुष्परिणाम' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन नार्को को-ऑर्डिनेशन अंतर्गत करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. भांडारकर अविनाश ओंकारराव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगितले. तसेच तरुण पिढीने अशा व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असा मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. शर्मिला भाऊसाहेब पारधे-देशमुख होत्या. त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षकांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली.

या प्रसंगी प्रा. डॉ. शेळके प्रदीप आबासाहेब, प्रा. पांढरे विलास देवराव, प्रा. जाधव विशाल रमाकांत  यांच्यासह बी. एड. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारी निर्माण करणारा ठरला.

पहा व्हिडिओ :


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने