Ahilyanagar : प.पू.डॉ.हेडगेवार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

ब्युरो टीम : विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) संचलित प.पू.डॉ.हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अहिल्यानगर याठिकाणी बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षासाठी एप्रिल 2025 मध्ये पार पडलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत महाविद्यालयाने यंदाही १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांचे हे यश महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण अध्यापन, प्रगल्भ मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित आहे.

पहा व्हिडिओ : दोन दशकांनंतर ठाकरे बंधू - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे - मराठी माणसासाठी एकत्र आले

बी.एड. प्रथम वर्ष 2024-25 : गुणवत्तेची झळाळी

प्रथम वर्षामध्ये एकूण ४४ विद्यार्थी शिक्षक - शिक्षिका यांनी परीक्षा दिली होती.  त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट ग्रेड प्राप्त करत उत्तीर्णतेची पातळी उंचावली आहे.

  • GPA 9.50 व त्यावरील (O - Outstanding) – 2 विद्यार्थी शिक्षिका
  • GPA 8.25 ते 9.49 (A+ - Excellent) – 38 विद्यार्थी शिक्षक - शिक्षिका
  • GPA 6.75 ते 8.24 (A - Very Good) – 2 विद्यार्थी शिक्षक - शिक्षिका

टॉपर विद्यार्थिनींची यादी (प्रथम वर्ष):

  1. बोरुडे मंजुषा दीपक – GPA : 9.70
  2. कलेढोणकर इनामदार वैष्णवी दयानंद – GPA : 9.50
  3. रायबोले साक्षी गौतम – GPA : 9.40
  4. लोंढे साक्षी अरविंद – GPA : 9.35
  5. हराळ अंजली सुहास – GPA : 9.30

पहा व्हिडिओ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे मानले आभार, कारण...

बी.एड. द्वितीय वर्ष 2024-25: उत्कृष्टतेकडे वाटचाल

द्वितीय वर्षात एकूण १८ विद्यार्थी शिक्षक - शिक्षिका परीक्षेला बसले होते. या सर्वांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत महाविद्यालयाचा शत-प्रतिशत निकालाची परंपरा सशक्तपणे पुढे नेली आहे.

  • CGPA 9.00 व त्यावरील (O - Outstanding) – 11 विद्यार्थी शिक्षक - शिक्षिका
  • CGPA 8.50 ते 8.99 (A+ - Excellent) – 6 विद्यार्थी शिक्षक - शिक्षिका
  • CGPA 6.75 ते 8.49 (A - Very Good) – 1 विद्यार्थी शिक्षक

टॉपर विद्यार्थिनींची यादी (द्वितीय वर्ष):

  1. गर्जे प्रतीक्षा संजय – CGPA : 9.75
  2. अन्सारी सना – CGPA : 9.40 
  3. सांगळे ऐश्वर्या विलास – CGPA : 9.40
  4. काळे पुष्पा अभिषेक – CGPA : 9.35
  5. वाघमारे वृषाली विलास – CGPA : 9.33
  6. साबळे पूजा  – CGPA : 9.30

पहा व्हिडिओ : अहिल्यानगर येथे 'संघ गंगा के तीन भगीरथ' या हिंदी नाटकाला नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

गुणवत्तेची जोपासना, यशाची शिडी

महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार अध्यापनाची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकसित होण्यासाठी विविध उपक्रम, सत्रे आणि प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. यावर्षी मिळालेल्या निकालाने महाविद्यालयाने गुणवत्ता, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर पुन्हा एकदा आपली शैक्षणिक ओळख अधोरेखित केली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पहा व्हिडिओ : मराठी विजयी मेळाव्यातील ठाकरे बंधूंच संपूर्ण भाषण


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने