विक्रम बनकर, अहिल्यानगर : पंढरपूर येथे मोठ्या भक्ती भावाने वारकरी दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले. भगवान श्री विठ्ठल सर्व व्यापक आहे. विठ्ठल भक्तीच्या महासागरात सर्व वारकरी एकरूप झाले होते. मंदिरे ही शक्ती केंद्र आहेत. मंदिर आकर्षक, सुंदर आणि भव्य असले तरी जोपर्यंत उपासना होत नाही. धार्मिक कार्य व पूजा श्रद्धा भावनेने होत नाही, तोपर्यंत त्या मंदिराला शोभा येत नाही. धर्म कार्य करताना सामाजिक कार्यातही हातभार लावावा. नित्यनियमाने मंदिरात हरिपाठ व महाआरती करावी. मंदिरात कोणताही भेदभाव नसावा, जरी पंथ वेगळे असले तरी भक्तांच्या मनातील भाव एकच असावा. निस्वार्थ भावनेने केलेली उपासनेने ईश्वर प्राप्ती होते, असे निरुपण देवगड देवस्थानचे महंत हभप भास्करगिरीजी महाराज यांनी केले आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर येथून देवगड येथे जाताना देवस्थानचे महंत हभप भास्करगिरी महाराज व देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांचे अहिल्यानगर किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी हभप भास्करगिरीजी महाराज बोलत होते.
याप्रसंगी दत्त मंदिरात नगर भक्त मंडळाच्या महिलांनी आकर्षक फुलांची रांगोळी व सजावट केली होती. तसेच भक्त मंडळातील महिलांनी महाराजांना औक्षण केले. सनी चौघडांच्या मधुर त्यांचे स्वरात स्वागत करण्यात आले. गुरुदत्त भक्तीधाम मंदिराच्या वतीने हभप भास्करगिरीजी महाराज यांचा सत्कार करण्यात आला.
गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात भगवान श्री दत्तात्रयांची महाआरती करण्यात आली. आरती नंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पाईपलाईन रोड किसनगिरी नगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा