Job update : १६ सप्टेंबर रोजी उद्योजक मेळाव्याचे आयोजन

ब्युरो टीम : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच डेअसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सेमिनार हॉल, लायब्ररी बिल्डिंग, न्यु आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, लालटाकी रोड, अहिल्यानगर येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रविकुमार म. पंतम यांनी केले.

जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील लघू उद्योजकांना एकत्र आणून ज्ञानाची देवाणघेवाण व नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देणे हा मेळाव्याचा उद्देश आहे. सोशल मीडिया व डिजिटल मार्केटिंगद्वारे व्यवसायवाढीबाबत तज्ञ मार्गदर्शन करतील. तसेच सूक्ष्म व लघू उद्योजकांच्या प्रश्नांना अचूक उत्तरे, उपयुक्त टिप्स व मोफत मार्गदर्शनही दिले जाणार आहे. उद्योजक मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/KyWejbvw8CDZ1CV89 या लिंकवर नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२४१-२९९५७३५ वर संपर्क साधावा. तसेच उद्योजक मेळावा समन्वयक वसीमखान पठाण (मो. ९४०९५५५४६५), संतोष वाघ (मो. ८८३०२१३९७६), बद्रिनाथ आव्हाड (मो. ९४२०७२५२८०) व योगेश झांजे (मो. ९५८८४०८८९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने