मांडओहळ मध्यम प्रकल्प हा पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्टयासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. सध्या धरणाची एकूण साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा २१० दशलक्ष घनफूट आहे. मात्र दरवर्षी परतीच्या पावसामुळे धरण अल्पावधीतच ओव्हरफ्लो होते.
खासदार नीलेश लंके यांच्या मते, जर धरणाच्या सांडव्याची उंची केवळ १ मीटरने वाढविण्यात आली तर धरणाचा पाणीसाठा मोठया प्रमाणावर वाढेल. या वाढीमुळे पारनेर तालुक्याच्या जवळपास अर्ध्या भागात सिंचन वाढले जाईल तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्नही मोठया प्रमाणावर सुटू शकतो.
पारनेर तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देणे ही काळाची गरज आहे. मांडओहळ प्रकल्पाची विद्यमान क्षमता अपुरी पडत असल्याने धरणाच्या सांडव्याची उंची वाढविणे अत्यावष्यक आहे. पवार यांनी यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक त्या प्रशासकीय प्रक्रियेला गती द्यावी अशी खा. लंके यांनी विनंती केली आहे.
गोदावरी खोऱ्यावर परिणाम नाही
मांडओहळ प्रकल्प गोदावरी खोऱ्यांतर्गत येतो. त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्याची उंची वाढविण्याबाबत प्रशासकीय स्तरावर अनेकदा अडचणी येत आहेत. त्यावर खा. लंके यांनी स्पष्ट केले आहे की, उंची वाढीमुळे गोदावरी खोऱ्याच्या जल हिशोबावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. उलट, जलसाठा वाढल्याने स्थानिक लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल.
टिप्पणी पोस्ट करा