PM Narendra Modi :पंतप्रधानांचे नागरिकांना आगामी स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भात संकल्पना पाठविण्याचे आवाहन

ब्युरो टीम : भारत देश यंदा 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे.

“आपल्या एक्स पोस्टवर  केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, या वर्षीच्या जवळ येत असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या भारतीयांच्या संकल्पना जाणून घेण्यास उत्सुक आहे!

या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपणास कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या ऐकायला आवडतील?” यासाठी नागरिकांनी MyGov आणि NaMo App वरील खुल्या मंचावर  आपले विचार व्यक्त करावेत असे आवाहन केले आहे. 

अधिक माहिती साठी

https://www.mygov.in/group-issue/let-your-ideas-and-suggestions-be-part-pm-modis-independence-day-speech-2025/ या संकेत स्थळाला अवश्य भेट द्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने