ब्युरो टीम : सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात शिपाई अशासकीय एक पद मेस्को मार्फत भरावयाचे आहेत. जिल्हयातील पात्र माजी सैनिकांनी सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 12 ऑगस्ट 2025 पुर्वी जिल्हा सैनिक कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींद तुंगार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या रोजगार पटावर नोंद असलेल्या माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल. प्राप्त अर्जामधील उमेदवारांची दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी दु.1.00 वाजता मुलाखत घेण्यात येईल.
सदर पदाकरीता ऑफीसमधील कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तरी सदर संधीचा सोलापूर जिल्यातील माजी सैनिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा