Beed :आष्टी तालूक्यातील सात गावातील पूरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी भारतीय सैन्याकडे मागीतली मदत

ब्युरो टीम : काल झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर आल्याने आष्टी तालुक्यातील कडा, सुलेमान देवळा, पिंपरखेड, धानोरा, शिरापुर, टाकळी अमिया आणि डोंगरगण या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच कडा गावातील 11 नागरिक तर सुलेमान देवळा 06, पिंपरखेड 03, धानोरा 03, डोंगरगण 03, शिरापुर 10 व टाकळी अमिया 15 असे एकूण सात गावात 51 लोक अडकलेले आहेत. यासाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण केले आहे तसेच एयरलिफ्टिंग ची व्यवस्था जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडुन मा. जिल्हाधिकारी यांचे प्रयत्नांनी करण्यात आलेली आहे. एअर फोर्सच्या माध्यमातून पूर बाधित गावांतील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी सैन्यदल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांचे माध्यमातून बचाव कार्य सुरू केलेले आहे. 

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड जिल्हा अजित पवार यांनी अतिवृष्टी, पूरबाधित गावांतील नागरिकांना आवश्यक ते मदतकार्य तात्काळ करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यांना सूचित केले आहे. त्यानुसार तात्काळ कार्यवाही स्थानिक पथक व शोध व बचाव पथकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 

जिल्हा नियंत्रण कक्ष, मंत्रालय नियंत्रण कक्ष,  एनडीआरएफ,  आर्मी, विभागीय नियंत्रण कक्ष यांचे सोबत समन्वय स्थापन करण्यात येत असून स्थानिक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचे सोबत जिल्हाधिकारी स्वतः संपर्क ठेवून आहेत व पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. पूरग्रस्त गावातील नागरिकांनी घाबरू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. जिल्हाधिकारी यांचेमार्फत सर्वांशी समन्वय साधून आवश्यक ठिकाणी मदत पाठवण्यासंदर्भात व बचाव कार्य करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. स्थानिक आमदार सुरेश धस हे प्रत्यक्ष घटनास्थळावर उपस्थित असून संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे मदतीत प्रत्यक्ष पूरबाधित क्षेत्रात मदत कार्य सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने