प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 15/09/2025 रोजी फिर्यादी श्री नागेश पांडुरंग पवार रा. राशिन ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांचे राशिन ते काळेवाडी जाणारे रोडलगत असलेले शिवम मशिनरी ऍ़ण्ड स्टुल्स दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने उचकटुन दुकानातील 64,000/- रुपये किमतीचे कॉपर वायर चोरुन नेलेली आहे. सदर घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. 508/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 305(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांचे दुकाने फोडुन दुकानातील कॉपर वायर चोरीच्या वारंवार घटना होत असल्याने श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस कॉपर चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, महादेव भांड, अरुण मोरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास कॉपर चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
पथकाने अहिल्यागर जिल्ह्यातील कॉपर चोरीचे घटनांठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची माहिती संकलित केली तसेच अशाप्रकारे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेण्यात आली. कॉपर चोरीच्या घटनाठिकाणची व्यवसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढली असता बहुतांश ठिकाणी तोंडास मास्क बांधलेले 06 ते 07 आरोपी असल्याचे दिसुन आले. पथकाने सलग 8 दिवस तपास करुन आरोपींनी गुन्ह्यामध्ये वापरलेली चार चाकी गाडी निष्पन्न केली. सदर चार चाकी गाडी वापरणारे इसमांची माहिती काढली असता सदरची गाडी ही रेकॉर्डवरील आरोपी महादेव पवार रा. अकलुज, सोलापुर हा वापरत असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर इसमाचा शोध घेत असतांना तो त्याचे साथीदारासह त्याचे राहते घरी आलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीनुसार नमुद इसमाचे घरी जावुन त्याचा शोध घेता 1) महादेव रंगनाथ पवार वय 48 वर्ष रा 21 चारी माळीनगर अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर, 2) दादा लाला काळे वय 19 वर्ष रा. सवतगाव ता. माळशिरस जि. सोलापुर असे मिळुन आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे 3) रामा लंग्या काळे रा. तुळजापुर नाका जुना डेपो, पारधी पेढी ता. जि. धाराशीव (फरार) 4) महादेव बाबु काळे रा. तुळजापुर नाका जुना डेपो, पारधी पेढी ता. जि. धाराशीव (फरार), 5) दिलीप मोहन पवार रा. 21 चारी माळी नगर ता. माळशिरस जि. सोलापुर (फरार) 6) सुरेश नामु काळे रा. सवतगाव ता. माळशिरस जि. सोलापुर (फरार), 7) सुरेश नामदेव चव्हाण रा. सवतगाव, ता. माळशिरस जि. सोलापुर (फरार) यांचेसह गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे. ताब्यातील आरोपींनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे 3,59,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे त्यांनी अशाप्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांचेकडुन अहिल्यानगर जिल्हा व सोलापुर जिल्ह्यातील खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 कर्जत, जि. अहिल्यानगर 508/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 331(4), 305(अ)
2 कर्जत, जि. अहिल्यानगर 525/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 331(4), 305(अ)
3 अकलुज, जि. सोलापुर 553/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 305(अ),331(4)
4 पंढरपुर, जि. सोलापुर 305/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 305(अ),331(4)
5 अकलुज, जि. सोलापुर 330/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 303(2),
6 माळशिरस जि. सोलापुर 391/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 303(2)
7 करमाळा, जि. सोलापुर 783/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 305(अ)
8 वैराग, जि. सोलापुर 241/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 305(अ),334(1)
आरोपी नामे महादेव रंगनाथ पवार हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी खालीलप्रमाणे सोलापुर, धाराशिव, सातारा, रायगड व पुणे जिल्ह्यामध्ये दरोड, घरफोडी व चोरीचे एकुण 13 गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 अकलुज जि. सोलापुर 535/2020 भा.द.वि. क. 457, 380, 34
2 वळसंग, जि. सोलापुर 282/2023 भा.द.वि. क. 380, 457, 34
3 टेभुर्णी, जि. सोलापुर 204/2018 भा.द.वि. क. 457, 380, 34
4 टेंभुर्णी, जि. सोलापुर 249/2018 भा.द.वि. क. 457, 380
5 कुरुडवाडी जि. सोलापुर 111/2008 भा.द.वि. क. 379
6 नातेपुते, जि. सोलापुर 168/2018 भा.द.वि. क. 454, 457, 380
7 वडुज, जि. सातारा 186/2018 भा.द.वि. क. 461, 380, 34.
8 म्हसवड, जि. सातारा 68/2018 भा.द.वि. क. 457, 380
9 कराड शहर, जि. सातारा 210/2012 भा.द.वि. क. 457, 380, 411, 34
10 उमरगा, जि. धाराशिव 277/2013 भा.द.वि. क. 395
11 मुरुम, जि. धाराशिव 1124/2013 भा.द.वि. क. 395
12 वालचंदनगर, जि. पुणे 153/2010 भा.द.वि. क. 457, 380
13 कळंबोली, जि. रायगड 94/1991 भा.द.वि. क. 457, 380
ताब्यातील आरोपींना कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. 508/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 305(a) गुन्ह्याचे तपासकामी कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
टिप्पणी पोस्ट करा