MP Nilesh Lanke : अकोल्याच्या विश्रामगडावर संवर्धन व स्वच्छता मोहिम

ब्युरो टीम : छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, दुर्गसंस्कृती आणि इतिहासाचे वैभव भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या गड-किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिमेचा पुढचा टप्पा आता अकोले तालुक्यातील ऐतिहासिक विश्रामगड येथे शनिवार दि.१३ सप्टेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी आपला मावळा संघटना आणि नीलेश लंके प्रतिष्ठान सज्ज झाले असून परिसरातील शिवभक्तांमध्ये या उपक्रमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. 

शिवनेरीपासून विश्रमागडापर्यंतचा प्रवास 

खा. लंके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त १० मार्च रोजी या उपक्रमाची घोषणा केली होती. १६ मार्च रोजी किल्ले शिवनेरीवरून मोहिमेला प्रारंभ झाला. त्यानंतर धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड आदी दुर्गांवर मोहिम राबवून शिवप्रेमींना एकत्र आणण्यात आले. प्रत्येक महिन्यात एका गडावर होणाऱ्या या उपक्रमाचा सातवा टप्पा आता विश्रामगडावर होणार आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक मोहीमेत राज्यभरातून शिवभक्तांचा उत्स्फूर्त  सहभाग दिसून आला असून ही चळवळ दुर्गसंवर्धनाचा एक नवा आदर्श ठरत आहे. 

सहभागाचे आवाहन 

गेल्या काही मोहिमांप्रमाणेच या मोहिमेतही राज्यभरातील शिवभक्त, स्थानिक नागरिक,तरूणाई यांचा मोठया प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. या माध्यमातून स्वच्छता, संवर्धन आणि शिवस्मृतींचे जतन करण्याचा संदेश समाजात रूजविण्याचा खा. नीलेश लंके यांचा संकल्प आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने